शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

देशभरातील खाद्यसंस्कृती कोल्हापुरात एकवटणार-‘द फूड स्पेस’ दालन: ‘भारत डेअरी’तर्फे नागरिकांच्या सेवेत रुजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 00:37 IST

कोल्हापूर : खाद्यसंस्कृतीच्या विविधतेचा प्रदीर्घ वारसा जपणाऱ्या कोल्हापुरात अत्याधुनिक पद्धतीच्या खाद्यसंस्कृतीचे दालन ‘भारत डेअरी’तर्फे खुले करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे खाद्यसंस्कृतीचा आदर करणारे कोल्हापूरकर ..तरुणांसाठी फूड कॅफे .. विविध प्रांतांची खाद्य खासियत..

कोल्हापूर : खाद्यसंस्कृतीच्या विविधतेचा प्रदीर्घ वारसा जपणाऱ्या कोल्हापुरात अत्याधुनिक पद्धतीच्या खाद्यसंस्कृतीचे दालन ‘भारत डेअरी’तर्फे खुले करण्यात येणार आहे. ‘द फूड स्पेस’ हे पश्चिम महाराष्ट्रातील वेगळे भव्य दालन खवय्यांच्या सेवेत रूजू होत आहे. या दालनाच्या माध्यमातून देशभरातील विविध प्रांतातील खाद्यसंस्कृती कोल्हापुरात एकवटणार आहे.

इतकेच नव्हे तर याचा आस्वाद घेण्याची संधीही खाण्याचे शौकीन असणाऱ्या कोल्हापूरकरांना मिळणार आहे.‘द फूड स्पेस’ या पश्चिम महाराष्ट्रातील पहिल्या भव्य फूड मॉलचा प्रारंभ होत आहे. हे दालन जुने देवल क्लब परिसरातील टेंबे रोडवर नागरिकांच्या सेवेत रूजू होत आहे. या दालनाचे उद्घाटन शनिवारी सकाळी दहा वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते व जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, महापौर स्वाती यवलुजे यांच्या उपस्थित होत आहे. यावेळी माजी आमदार महादेवराव महाडिक, खासदार धनंजय महाडिक, आमदार सतेज पाटील, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या शुभारंभास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन ‘भारत डेअरी’ चे संचालक मेहता परिवारातर्फे केले आहे.विविध प्रांतांची खाद्य खासियत..‘द फूड स्पेस’ या नव्या दालनात देशभरातील विविध प्रांतांतील खाद्यपदार्थ मिळणार आहेत. त्यात जीभेवर विरघळणाऱ्या मिठाई, डोळे मिटून मनापासून आस्वाद घेता येणारे नमकीन यासह विविध दुग्धजन्य पदार्थ आणि बेकरी प्रॉडक्टस्चा समावेश असणार आहे. देशभरातील ओरिजनल मिठाई ‘एकाच छताखाली’ उपलब्ध असणार आहेत. आगºयाचा पेठा, काश्मीरचा कावा, मेथी पाक, खजूर पाक, गुजरातचा मोहनथाळ, फ्रोजन प्रॉडक्ट, शुगर फ्री मिठाई, कोलकात्याचा रसगुल्ला, धारवाडी पेढा, बेळगावी कुंदा अशा एक ना अनेक प्रकारच्या मिठाई येथे मिळणार आहेत. यासह हैद्राबादच्या प्रख्यात बेकरीची उत्पादने अशा वैशिष्ट्येपूर्ण खाद्यपदार्थांची रेलचेल येथे असणार आहे. हे सर्व मिळणार आॅफर्सचे स्वरूपात.तरुणांसाठी फूड कॅफे ..‘द फूड स्पेस’ या फूड मॉलमध्ये आबालवृद्धांबरोबरच तरुणांच्या आवडीचाही आवर्जून विचार करण्यात आला आहे. याकरिता मॉलच्या दुसºया मजल्यावर ‘फूड कॅफे’ तयार करण्यात आले आहे. तरुणाईला आवडणारे पिझ्झा, बर्गर, हॉट डॉग यासह विविध प्रकारची सरबते, कोल्ड्रिंक्स, कुलर्स, रिफ्रेशर्स येथे उपलब्ध असणार आहे. एकट्या फ्रेंच फ्राईजमध्ये ६ ते ७ फ्लेवर्स चाखायला मिळणार आहेत. त्याचा आवर्जून लाभ कोल्हापूरकरांनी घ्यावा, असे आवाहन मेहता परिवारातर्फे करण्यात आले आहे.खाद्यसंस्कृतीचा आदर करणारे कोल्हापूरकर ..धार्मिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, शैक्षणिक, सामाजिक आणि निसर्गसंपन्नता अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असणाºया कोल्हापूरने कला आणि क्रीडाक्षेत्रातही आपला दबदबा निर्माण केला आहे. स्वभावाने रांगड्या पण प्रत्यक्ष पे्रमळ असणाºया कोल्हापूरकरांचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्येगिरी होय. चमचमीत, झणझणीत पदार्थांवर ताव मारणारे कोल्हापूरकर रूचकर, गोडधोड, चटपटीत पदार्थही तितक्याच आवडीने खातात. त्यामुळे कोल्हापुरात ठिकठिकाणी अनेक खाऊ गल्ल्या निर्माण झाल्या आहेत. प्रत्येक खाद्यपदार्थांचा चवीने आस्वाद घेत तो कसा तयार होतो, याची आपुलकीने चौकशीही करतात. त्यामुळे विविधतेने नटलेल्या खाद्यसंस्कृतीचा आदर करणारे शहर म्हणजे कोल्हापूर असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfoodअन्नbusinessव्यवसाय